1.The Opening

  1. १. अल्लाहच्या नावाने आरंभ करतो, जो मोठा कृपावान आणि अतिशय दया करणारा आहे
  2. २. सर्व स्तुति - प्रशंसा अल्लाहकरिता आहे, जो समस्त विश्वाचा पालनहार १ आहे
  3. ३. मोठा कृपावान, अतिशय दया करणारा आहे
  4. ४. मोबदल्याच्या दिवसा (कयामत) चा स्वामी आहे
  5. ५. आम्ही तुझीच उपासना करतो आणि तुझ्याकडेच मदतीची याचना करतो
  6. ६. आम्हाला सरळ (सत्य) मार्ग दाखव. १
  7. ७. अशा लोकांचा मार्ग, ज्यांच्यावर तू कृपा केली, त्या लोकांचा नव्हे, ज्यांच्यावर तुझा प्रकोप झाला आणि ना मार्गभ्रष्ट झालेल्यांचा